ओढणीनं पेट घेतला आणि घडली दुर्घटना
नवरात्रौत्सवात अष्टमीच्या दिवशी देवीसाठी होम करायचं ठरलं. सगळी तयारी झाली आणि होमही सुरु झाला. या होमकुंडात तूप टाकत असताना अचानक सरिता यांच्या ओढणीने पेट घेतला. पूजेसाठी बसल्या असताना अचानक त्यांच्या ओढणीला आग लागली. ही आग विझवेपर्यंत उशीर झाला आणि त्या यामध्ये होरपळल्या. त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेदरम्यान त्या खूप भाजल्या होत्या.
advertisement
मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
33 वर्षांच्या सरिता ढाका यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ही धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर इथे घडली आहे. आधी ओढणी पेटली आणि नंतर अंगावरच्या कपड्यांनी पेट घेतला. icu मध्ये त्या जवळपास दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र ही झुंज अपयशी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरिता यांचे पती आणि त्या डोंबिवली इथे राहात होत्या. त्यांनी घट बसवले होते. अष्टमीला पूजेचा घाट घातला. सागरसंगीत नैवेद्य तयार केला. सरिता ढाका पूजा करुन होमसाठी बसल्या. होम कुंडात तूप टाकताना किटाळ उडालं आणि ओढणी जळाली. ओढणी पाठोपाठ ड्रेसही जळाला. यामध्ये त्या गंभीर भाजल्या, त्यांना उपचारासाठी एम्समधील रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.