दिवाळीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताना आपली फसवणूक होऊ नये, याकरता छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस थेट बाजारपेठेत उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये जाऊन जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये शहरातील पोलिसांनी हातामध्ये पॉम्पलेट त्यासोबत पोस्टर घेऊन खरेदी करता आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केलेलं आहे.
advertisement
या पॉम्पलेटच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सांगितलं आहे की, तुमची कशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक होऊ शकते आणि यावर तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याचं मार्गदर्शन पोलिसांनी नागरिकांना केलेलं आहे. यावेळी पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करा पण सावध राहा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, ओटीपी कुणालाही सांगू नका, असे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पोलीस सध्या करत आहेत.
यावेळी नागरिकांनी देखील पोलिसांना सांगितले की, आम्ही देखील योग्य ती काळजी घेऊन ऑनलाईन खरेदी करू. त्यासोबत जे विश्वासू ॲप आहेत, त्यावरूनच आम्ही खरेदी करू असं नागरिक म्हणाले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन खरेदी करत असाल तर योग्य ती काळजी घेऊन ऑनलाईन खरेदी करा. त्यासोबत जे विश्वासू वेबसाईट आहेत किंवा ॲप आहेत, त्यावरूनच तुम्ही खरेदी करा. कुठल्याही अनोळखी ॲपवरून खरेदी करू नका, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही, असा संदेश पोलिसांनी दिलेला आहे.