क्रॉफर्ड मार्केटमध्ये फक्त 100 ते 250 रूपयांमध्ये अशा वस्तू मिळतात, ज्या दिसायला महागड्या आणि एक्स्पेन्सिव्ह वाटतात. यामध्ये सर्वात जास्त मागणी आहे ती इम्पोर्टेड ग्लासेसची. हे ग्लासेस वेगवेगळ्या स्टाइलमध्ये उपलब्ध असून, डेली युज, ऑफिसमध्ये वापरण्यासाठी किंवा पार्टी वेअर तसेच क्लासिक लुकसाठी योग्य आहेत. विशेष म्हणजे हे इम्पोर्टेड ग्लासेस फक्त 100 रुपयांपासून येथे मिळतात, जे सिक्रेट सांता गिफ्टसाठी एक परफेक्ट पर्याय ठरत आहेत. याचबरोबर हातात घालण्यासाठीचे ब्रेसलेट्स देखील येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये ऑक्साइड, सिल्व्हर आणि मेटल अशा तीन प्रकारचे ब्रेसलेट्स मिळतात.
advertisement
वेगवेगळ्या रंगांमध्ये, डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये असलेली ही ब्रेसलेट्स महिला आणि पुरुष दोघांसाठीही योग्य आहेत. विशेष म्हणजे ही ब्रेसलेट्स फक्त 100 रुपयांत उपलब्ध असून, दिसायला स्टायलिश आणि ट्रेंडी असल्यामुळे गिफ्ट म्हणून खूप पसंत केली जात आहेत. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बॅग्स हा देखील एक महत्त्वाचा गिफ्ट पर्याय ठरत आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये या बॅग्स फक्त 200 रुपयांत उपलब्ध आहेत. या बॅग्समध्ये कॉर्पोरेट लुकसाठी योग्य असे सिंपल डिझाईन्स, ट्रॅडिशनल लुकसाठी सूट होणाऱ्या स्टाइल्स तसेच कॅज्युअल आणि ट्रेंडी लुकसाठी परफेक्ट जाणाऱ्या बॅग्सचा समावेश आहे. त्यामुळे सिक्रेट सांता गिफ्टसाठी या बॅग्सना मोठी मागणी आहे.
याशिवाय, सिक्रेट सांता थीमशी संबंधित खास गिफ्ट्स देखील येथे उपलब्ध आहेत. सांताक्लॉज, ख्रिसमस डेकोर, शोपीस, गिफ्ट आयटम्स आणि सजावटीच्या वस्तू 300 ते 350 रुपयांपासून येथे मिळतात. कमी बजेटमध्ये ख्रिसमसचा फील देणाऱ्या या वस्तू सिक्रेट सांता गिफ्टसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत.