संपूर्ण कुटुंब बाहेर; घरातच नोकराने मारला डल्ला
तक्रारदार व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वी राजू भावेश नावाच्या व्यक्तीला घरकामासाठी ठेवले होते. 12 जानेवारीपासून तो घरात काम करत होता. 14 जानेवारी रोजी तक्रारदाराचे आई-वडील जयपूर येथे देवदर्शनासाठी जाणार असल्याने त्यांना नवी मुंबईतील विमानतळावर सोडण्यासाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर गेले होते. हीच संधी साधत राजूने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरी केली.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीचा उलगडा
सायंकाळी सुमारे सव्वासहा वाजता आरोपीने घरातील तिन्ही लॉकर उघडून त्यातील हिरेजडीत आणि सोन्याचे दागिने तसेच चांदीचे शिक्के चोरले. मात्र, डिजिटल लॉकर तो उघडू शकला नाही. रात्री आठच्या सुमारास कुटुंब घरी परतल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. तत्काळ घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता राजू हा घरातून बाहेर जाताना स्पष्टपणे दिसून आला.
चोरीप्रकरणी आरोपीच्या मागावर गुजरातमध्ये शोधमोहीम
चोरीनंतर राजू फरार झाला असून तो अहमदाबादकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक गुजरातमध्ये रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घरकामासाठी नोकर ठेवताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
