नेमकं काय म्हणाले शरद पवार?
'आज बैठक आहे, बैठकीला येण्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंनी फोन केला.चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्याशी बोलणार नाही. आजच्या बैठकीनंतर पीएम पदाबाबत ठरेल. अजून ठरवलं नाही मग कोणाचं नाव का घ्यायचं? माझं वयैक्तिक मत महत्त्वाचं नाही. नितीश कुमारांशी संपर्क करण्याची अजून आमच्यात चर्चा नाही, बैठकीत रनणिती ठरेल' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात मोदी विरोधात लाट होती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ४० पैकी ३० जागा एनडीएने जिंकल्या आहेत. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला १२ जागा जिंकता आल्या आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर नितीश कुमार एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. बिहारचे विरोधी पक्षनेते असलेल्या तेजस्वी यादव यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच विमानाने दिल्लीला गेले. त्यांचा विमानातील फोटोही समोर आला आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पटनाहून विस्ताराच्या UK ७१८ विमानाने दिल्लीत पोहोचले.