शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा दादर येथील शिवाजी पार्क येथे पार पडला. या मेळव्यानंतर अनेक शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गर्दी केली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी गॅलरीत उभ्या राहून शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
advertisement
ताईसाहेब, माननीय राज ठाकरे महाराष्ट्राचे वाघ, धुळ्याहून आलोय. माननीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र या, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. तसंच, अनेक शिवसैनिक दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे अश्या घोषणा देत होते. 'जय महाराष्ट्र'चा जयघोष ही जोरात या ठिकाणी करण्यात आला. शर्मिला ठाकरे यांनीही शिवसैनिकांना हात उंचावरून सगळ्यांचे आभार मानले.
राज ठाकरे आणि मी एकत्रच!
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून राज ठाकरे यांच्यासोबत युतीवर भाष्य केलं. "तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, अरे मग ५ जुलैला काय केलं होतं, आम्ही एखत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी/ जिथे मातृभाषेचा घात होईल तिथे फूट पडू देणार नाही. जाहीरपणे सांगतो, हिंदीची सक्ती आमच्यावर करायची नाही, हिंदीची सक्ती सहन करणार नाही. प्रांत रचनेनुसार प्रत्येकाला भाषा मिळाली. गुजरात, तमिळ, झारखंड ,तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला सरकार आणि राजधानी मिळाली. मुंबई रक्त सांडवून मिळवली, जर व्यापाऱ्चाच्या खिश्यात जाणार असेल तर खिसा फाडून टाकू,' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीवर भूमिका स्पष्ट केली.