मुंबई : मुंबईत चेंबूर येथील RCF कर्मचारी सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्धघाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. RCF कर्मचारी सेनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयाच्या उद्घाटनाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. कार्यक्रम निवडणुकीच्या आधी ठरला होता. कोणी तंगडं घातले माहितीय आणि आपल्यात तंगडं घातले की आपण लंगडं करतो. आता परत काही आपल्यात तंगडं घालणार नाही.
advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. राज्यातील बहुतांश महिलांच्या खात्यात या योजनेंतर्गत पैसे जमा झाले. मात्र या योजनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणीना १५०० रुपये असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. आमदार आणि खासदार आपला पुन्हा निवडून आला पाहिजे यासाठी काम केले पाहिजे. आता येणारी विधानसभेची निवडणूक धर्म रक्षणाची आणि महाराष्ट्र प्रेमींची निवडणूक आहे. आता तुम्ही पळणे शक्य नाही कारण एकदा जो स्थिरावतो तो पळत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आरसीएफची वाटचाल तुम्ही पाहिली. संकट नव्याने उभे राहत आहे. आताच्या खोके सरकारने जमिनी विकायला काढल्या आहेत. मराठी माणूस हद्दपार झालं पाहिजे अशी सुपारीच घेतली आहे त्यांनी. खाजवून तर बघा तुम्ही. मराठी माणसाला बिल्डिंग मध्ये नो एंट्री, मग आम्ही ते १९६६ च्या सालासारखे करायचे का? असा सवालही ठाकरेंनी विचारला.
मागे खताच्या बॅगव्हर सुद्धा मोदींचा फोटो त्यांचा काही संबध नाही. राष्ट्रीय विचारांचे जे बी बियाणे आहे ते फोफावण्याचे काम तुम्ही करताय. शेतकऱ्याला तुमच्यात आरसीएफ मध्ये आधार वाढतो आहे. तुम्ही बोगस बी बियाणे उखडून टाकले, तुम्ही आम्ही जे पेरले होते ते तुम्ही उखडले. आपले जे आहेत तेच बी वर आले पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर विरोधकांवर टीका केली.
बांद्रा येथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागेबाबतचा निर्णय आम्ही घेतला होता. कोर्टाला आम्ही जागा सुचवली होती तेव्हा मान्यता दिली. मग आता काय झाले. कोर्टाच्या नावाने आता भूखंड कोर्टाला देणार. अनेक भूखंड अदानीच्या घशात घालायचे. वांद्रे येथील कर्मचाऱ्यांना तिथेच घर मिळाले पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
