सुखी संसाराचे स्वप्न 11 महिन्यात संपले
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव नेहा गुप्ता असून तिचा विवाह 2024 मध्ये अरविंद गुप्ताशी झाला होतो. पण लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न रंगवणार त्यात काही महिन्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूचा दोष महिलेच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्यांना दिला आहे. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, नेहावर लग्नानंतरपासूनच हुंड्याच्या कारणावरून सतत छळ होत होता. सोनं, चांदी आणि गाडी देऊनही सासरचे समाधानी नव्हते, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.
advertisement
धक्कादायक म्हणजे, नेहाच्या मृत्यूपूर्वी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी पती अरविंद आणि त्याच्या कुटुंबाने न्यायालयात नोटरी करून ''आम्ही पुन्हा छळ करणार नाही'' असा करार सुद्धा केला होता. पण तरीही तिचा त्रास थांबा नाही. फेब्रुवारीमध्ये नेहाचा गर्भपात झाला होता आणि त्यानंतरच नेहाच्या कुटुंबाने महिला आयोग आणि खार पोलिसांकडे तक्रार दिली होती.
वडील राधेश्याम गुप्ता यांनी सांगितले की, 3 ऑक्टोबर रोजी माझा जावई माझ्या मुलीला घेण्यासाठी उत्तर प्रदेशात आला होता. ती तेव्हा पूर्णपणे ठिक होती. त्यानंतर 5 ऑक्टोबरला ते मुंबईत पोहोचले आणि 16 ऑक्टोबरला तिचा मृतदेह आम्हाला दिसला. एवढ्या कमी कालावधीत नेमकं काय घडलं? आम्हाला शंका आहे की तिला हळूहळू विष देण्यात आलं.
खार पोलिसांनी नेहाच्या मृत्यूनंतर 18 ऑक्टोबरला राधेश्याम यांच्या तक्रारीवरून पती अरविंद, सासरे मनोज गुप्ता, सासू मीरा गुप्ता आणि नणंद प्रीती गुप्ता यांना अटक केली आहे. नेहाच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे ठोस कारण समोर आलेले नाही.
नेहाची वडिलांकडे वारंवार तक्रार
राधेश्याम यांनी पुढे सांगितले, नेहा वारंवार फोनवर सांगायची की सासरचे लोक तिला काहीतरी देतात, ज्यामुळे ती अशक्त वाटते. आम्हाला वाटतं ती स्लो पॉयझनिंगची शिकार झाली आहे. या प्रकरणामुळे खार परिसरात आणि संपूर्ण मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. हुंडाबळी आणि छळाच्या या थरकाप उडवणाऱ्या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
