मोठा अपघात थोडक्यात टळला
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून एसी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर धावतात. त्यात काही जलद एसी लोकल काही स्थानकाचे थांबे घेत मुख्य स्थानकात पोहचतात. कालही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 8.56 ला जलद एसी लोकल कल्याण दिशेला रवाना झाली होती.
सीएसटीवरुन निघाल्यानंतर कल्याण दिशेने जाताना काही स्थानकावर याचा थांबा ठरलेला होता,ज्यात भांडूप स्थानकाचाही समावेश होता. मात्र भांडूप स्थानकावर आल्यानंतरही ही एसी जलद लोकल वेगात होती. कारण या स्थानकावर थांबा होता ते मोटरमन विसरला होता.पण काही क्षणात चूक लक्षात येताच लगेचच मोटारमनने लोकल थांबवली.
advertisement
शेवटी घडला थरकाप उडवणारा प्रकार
मात्र वेगाने असलेली एसी लोकलने तोपर्यंत पुढच्या दोन डब्ब्यांनी प्लॅटफॉर्मवरील निश्चित थांबा ओलाडंला होता. प्लॅटफॉर्म सोडून लोकल दोन डब्बे पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी प्लॅटफॉर्मपासून पुढे गेलेल्या डब्यातील प्रवासी अन्य डब्यांतून प्लॅटफॉर्मवर उतरले.
