मिळालेल्या माहितीनुसार, वरळीजवळील कोस्टल रोडवर मंगळवारी पहाटे ही घटना घडली. मुंबई कोस्टल रोडवर एका चालकाची कार आऊटऑफ कंट्रोल झाली आणि कठडा तोडून समुद्रात कोसळली. ही घटना घडली जेव्हा चालक वळण घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचं नियंत्रण सुटलं आणि वेगाने जाणारी कार रेलिंगला धडकली आणि सुमारे 30 फूट समुद्रात कोसळली. गस्तीवर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानांनी जलद कारवाई केल्याने ही दुर्घटना टळली. त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं.
advertisement
गाडी समुद्रात बुडाली होती आणि ती बाहेर काढली. पोलिसांना संशय आहे की कार चालक दारूच्या नशेत होता आणि रक्ताचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. कार महालक्ष्मीहून वरळीकडे जात असताना ही घटना घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, ज्यामुळे ती रेलिंग तोडून सुमारे 30 फूट उंचीवरून समुद्रात पडली.
MSF कर्मचाऱ्यांना कार अपघात झाल्याचे लक्षात आलं आणि त्यांनी गाडीतील प्रवाशाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून आपला जीव धोक्यात घातला. काही वेळाने त्यांनी कार चालकाला वाचवलं आणि दोरीच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढलं. या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि घटनेचा तपास सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.