TRENDING:

Maharashtra politics : बारामती विधानसभेसाठी मविआकडून कोणाला उमेदवारी? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं...

Last Updated:

'न्यूज 18 लोकमत'नं खासदार सुप्रिया सुळेंची EXCLUSIVE मुलाखत घेतली यावेळी त्यांनी विवीध विषयांवर भाष्य केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, प्रतिनिधी : खासदार सुप्रिया सुळेंची न्यूज 18 लोकमतनं EXCLUSIVE मुलाखत घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 'पक्ष नव्हता, चिन्हं नव्हतं तरी देखील जनतेनं आम्हाला आशिर्वाद दिले,' असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकाराची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'लोकांना खूप आत्मविश्वास वाटतोय, आमच्याकडे पक्ष नव्हता, चिन्हं नव्हतं. तरीही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीसोबत उभी राहिली.  मविआच्या पदरात खूप मोठं यश पडलं, आमची आता जबाबदारी वाढली आहे. लोकसभेतील यश आम्हाला अपेक्षित नव्हतं,

advertisement

शरद पवारांकडून पक्ष काढून घेतला, बाळासाहेबांना यांनी दु:ख दिलं, आता राज्यात सरकार बदलण्याची गरज आहे,' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे, याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. बारामतीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेऊ

advertisement

सगळी माहिती काढून बोललेलं बरं, जागावाटप लवकरच कळेल असं त्यांनी म्हटलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून देखील जोरदार टोला लगावला आहे. भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान झाला, नाती 1500 रुपयांनी जोडता येत नाही, व्यवहार आणि नात्यातला फरक कळाला नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra politics : बारामती विधानसभेसाठी मविआकडून कोणाला उमेदवारी? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल