TRENDING:

Innova झाली आऊटऑफ कंट्रोल, डिव्हायडरवर जाऊन धडकली; मुंबईत विचित्र अपघाताचा PHOTOS व्हायरल

Last Updated:

Mumbai Accident: मुंबईतल्या हाय प्रोफाईल एरियामध्ये इनोव्हा कारच्या ड्रायव्हरचे कार चालवताना नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईतल्या हाय प्रोफाईल एरियामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेमध्ये किती प्रवासी जखमी झाले आहेत किंवा किती प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून घटनेची चौकशी केली जात आहे. जुहू परिसरामध्ये इनोव्हा कारच्या ड्रायव्हरचे कार चालवताना नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.
News18
News18
advertisement

जुहू परिसरातील नेहरू नगरातील एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नेमका हा भीषण अपघात कसा घडला याचा तपास मुंबई पोलिसांकडून घेतला जात आहे. शिवाय, इनोव्हा कार रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला जाऊन कशी धडकली? याचाही सध्या पोलीस शोध घेत आहेत.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कारची धडक इतकी जोरदार होती की, रस्त्यामध्ये असणाऱ्या थेट दुभाजकाला येऊनच धडकली. ही कार दुभाजकाला धडकून थेट रस्त्याच्या मधोमध आडवी आली होती. जुहूतल्या या अपघाताचे फोटोज् सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'जुहू बझ' या इन्स्टा पेजने अपघाताचे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. घटनेविषयीची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. नेमकी घटना कशी घडली? घटनेत जखमींची संख्या किती? किती जणं जखमी झाले आहेत? कारचं सुद्धा किती नुकसान झालं आहे? घटनेविषयीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे.

advertisement

मुंबईमध्ये अपघातांचे सत्र सुरूच

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
reel star ची शूटसाठी आवडती जागा, मुंबईत इथं येईल गोव्यासारखा फील, तुम्ही दिलीये कधी भेट?
सर्व पहा

दरम्यान, रविरारी अर्थात 16 मार्च रोजी दहिसर पूर्वेत एका डंपर ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे 28 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली तो तरूण आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दहिसर पोलिसांनी ठाण्याचा रहिवासी असलेल्या 43 वर्षीय अखबर पठाण या ढंपर ट्रक चालकाला अटक केली आहे. अंधेरी पश्चिममध्ये राहत असलेल्या 28 वर्षीय समीर शेख डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अपघाताची घटना घडताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी त्याला तपासून लगेचच मृत घोषित केले.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Innova झाली आऊटऑफ कंट्रोल, डिव्हायडरवर जाऊन धडकली; मुंबईत विचित्र अपघाताचा PHOTOS व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल