ठाणे रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या प्रतिक्षेत असलेले एक आई- वडील आपल्या बाळाला झोपवताना दिसत आहे. मेगाब्लॉकमुळे ट्रेन उशिरा असल्यामुळे आई- वडिलांनी आपल्या बाळाला हातावरच झोळी बनवून झोपवले. दाम्पत्याने ओढणीला झोळी बनवून आपल्या बाळाला झोपवताना दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर बाळाला झोपवताना आई-वडीलांची कसरत एका मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या घोषणांच्या आवाजात आणि ट्रेनच्या हॉर्नच्या आवाजात आई- वडील आपल्या बाळाला झोपवताना दिसत आहे. एका इन्स्टाग्राम चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 26 ऑक्टोबरचा (रविवार) असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्या दोघांवरही नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 26, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मेगा ब्लॉकची कसरतही गोड झाली! पालकांचा लेकरासाठी ‘जुगाड झोका’, सोशल मीडियावर हिट
