बँक किंवा एटीएमसाठी आरक्षित असलेल्या बिंबिसार नगरमधील या दुकानाची बेस प्राईज गेल्या लिलावात 13 कोटी 93 लाख रुपये होती. यंदाच्या लिलावात या दुकानाची बेस प्राईज कमी करण्यात आली आहे. आता या दुकानाची बेस प्राईज 12 कोटी 63 लाख रुपये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षी या दुकानाची विक्री होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
advertisement
डोंबिवलीतून महत्त्वाची बातमी, धोकादायक इमारतीमुळे 8 दिवस रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?
दुकानांची लोकेशन
म्हाडाच्या दुकानांच्या या लिलावात मुलुंड गव्हाणपाडा येथील 6, कुर्ला-चुनाभट्टी स्वदेशी मिल येथील 5, तुंगा पवई येथील 2, कोपरी पवईतील 23, चारकोपमधील 23, जुने महावीर मागाठाणे येथील 6, नगर कांदिवली पश्चिम येथील 6, प्रतीक्षा नगर येथील 9, अॅण्टॉप हिल येथील 3, मालवणीमधील 46, गोरेगाव बिंबिसार नगर येथील 17 व गोरेगावच्या शास्त्री नगर आणि सिद्धार्थ नगर, जोगेश्वरी मजासवाडी येथील प्रत्येकी एक दुकानाचा समावेश आहे.
29 ऑगस्ट रोजी निकाल
दुकानांसाठी ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पात्र ठरलेले अर्जदार www. eauction.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलावात सहभागी होऊ शकतील. 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.