डोंबिवलीतून महत्त्वाची बातमी, धोकादायक इमारतीमुळे 8 दिवस रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Dombivli News: डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा प्रमुख रस्ता आठ दिवस बंद राहणार आहे.
डोंबिवली: डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एका धोकादायक इमारतीमुळे डोंबिवलीतील प्रमुख मार्गावरची वाहतूक 8 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर कराव, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ मार्गालगत एव्हरेस्ट सोसायटी परसिरात एक धोकादायक इमारत आहे. ही इमारत तोडण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेकडे कोपड पुलावरून येणाऱ्या वाहनांना डावीकडे वळत घेऊन जुन्या डोंबिवली मार्गाने स्वामी शाळेजवळून इच्छित ठिकाणी जावे लागेल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
advertisement
एव्हरेस्ट सोसायटी परिसरातील धोकादायक इमारत तोडण्यासाठी 11 ते 18 ऑगस्ट या काळात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत कोपर उड्डाणपूलाकडून येणाऱ्या वाहनांना हॉटेल रणजीत पॅलेसजवळ प्रवेश बंद राहील. या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ही अधिसूचना पोलीस वाहन, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर तसेच ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंधनकारक नसेल असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 08, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीतून महत्त्वाची बातमी, धोकादायक इमारतीमुळे 8 दिवस रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?


