शीव दरम्यान तिघे प्रवासी रुळावर कोसळले
घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना तातडीने सायन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन प्रवाशांची प्रकृती स्थिर असून एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
घटनेनंतर नऊ मिनिटांसाठी लोकल वाहतूक ठप्प
अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड इक्विपमेंट क्रमांक 5 तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा सुमारे नऊ मिनिटे प्रभावित झाली. काही लोकल गाड्या उशिराने धावल्या, तर काही ठिकाणी प्रवाशांना थांबावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ओएचई पुन्हा सुरू करण्यात आले आणि लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की सायन स्थानक हे नॉन-ऑपरेशनल स्टेशन आहे. येथे नियमित स्टेशन मास्टर नसून संपूर्ण जबाबदारी स्टेशन अधीक्षकांकडे असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
लोकलमधून पडलेल्या तिघांची ओळख पटली
या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची ओळख पटली असून गोवंडी येथील रहिवासी 36 वर्षीय अफझल चौधरी, नालासोपारा येथील रहिवासी 21 वर्षीय सचिन विश्वकर्मा आणि कुर्ला येथील रहिवासी 25 वर्षीय जैनिल सय्यद अशी त्यांची नावे आहेत. जखमी प्रवाशांचे सविस्तर जबाब नोंदवल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.
