TRENDING:

काळाचौकी परिसरात बॉयफ्रेंडने हल्ला केलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, प्रेमाचा रक्तरंजित शेवट

Last Updated:

जखमी तरुणीला जवळच्याच केम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वंजारा, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका तरूणाने तरूणीवर जीवघेणा हल्ला करून स्वत:ला संपवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरूणीचाही मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ८-१० दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता.

मृत तरुणाचे नाव सोनू बरई आहे. तर मृत तरूणीचे नाव हे मनिषा यादव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबध होते, मात्र मृत तरुण वारंवार मुलीवर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये ८ दिवसापूर्वी वाद झाला होता, यातून दोघांचा ब्रेकअप झाले होता. शेवटचं भेटण्यासाठी तरुणाने तरुणीला बोलवलं होतं. दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर किटचेन कनिफेने वार तरुणीवर करण्यात आले. जीव वाचवण्यासाठी जेव्हा ती तरुण या नर्सिंग होममध्ये घुसली. त्यावेळेला तिथे सुद्धा तिच्यावर सुद्धा वार केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर वार केले, यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

परिसरात खळबळ 

जखमी तरुणीला जवळच्याच केम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने तरूणीचा अवघ्या तीन तासात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईच्या काळाचौकीसारख्या गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने थरारक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचा सतत कोरडी पडते? आहारात समावेश करा हे तूप, दिसेल तजेलदार
सर्व पहा

ब्रेक अप झाल्यानंतर आरोपीनं तरुणीला भेटायला बोलवलं होतं. यावेळी दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आरोपीनं रागाच्या भरात तरुणीवर चाकुने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तरुणी नर्सिंग होममध्ये घुसली. पण आरोपीनं पाठलाग करत तिथे पुन्हा तिच्यावर हल्ला केला. तरुणीला रक्तबंबाळ केल्यानंतर आरोपीनं स्वतःचा गळा चिरून घेतला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र जखमी तरुणीला जवळच्याच केईएम रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
काळाचौकी परिसरात बॉयफ्रेंडने हल्ला केलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, प्रेमाचा रक्तरंजित शेवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल