Skin care Tips : त्वचा सतत कोरडी पडते? आहारात समावेश करा हे तूप, दिसेल तजेलदार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गाईचे तूप हे त्वचेला आतून पोषण देते. त्यामुळे त्वचा सतेज राहते आणि विविध समस्या निर्माण होत नाही. हिवाळ्यात गाईचे तूप दररोज आहारात घेतल्याने त्वचेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे खाज येणे, बारीक पुरळ येणे, ओठ आणि टाचांना भेगा पडणे, अशा समस्या अनेकांना होतात. या समस्यांवर बाजारातील वेगवेगळे प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात वापरले जातात मात्र त्याचा परिणाम तात्पुरता जाणवतो. मग यावर उपाय नेमका काय करायचा? तर गाईचे तूप आहारात घेतल्याने या समस्या आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
advertisement
advertisement
गाईचे तूप आहारात घेतल्यास त्वचेला आतून पोषण मिळते. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. गाईचे तूप त्वचा कोरडी होऊ देत नाही. त्यामुळे त्वचा मुलायम आणि लवचिक राहण्यास मदत होते. गाईचे तूप सेवन केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. तूप रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे चेहरा निस्तेज न दिसता उजळ आणि तजेलदार दिसू लागतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


