अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शक्ती शंकर मंडल आणि विजय देवेंद्र अशी आहेत. हे दोघेही पीडित व्यावसायिकांच्या घरी सफाई कामासाठी येत होते. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, शक्ती मंडलवर यापूर्वीही तीनपेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत चोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पत्नीच्या आजारपणासाठी चक्क दरोडा
advertisement
दुसरा आरोपी विजय देवेंद्र याने चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. पत्नीच्या आजारपणासाठी उपचाराचा खर्च उभा करण्यासाठी आपण चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे. पैशांची गरज असल्याने त्याने या गुन्ह्यात सहभाग घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीची घटना कशी घडली?
ही चोरी 76 वर्षीय व्यावसायिक नैषध पटेल यांच्या घरी घडली. पटेल हे रबर उत्पादनाच्या व्यवसायात कार्यरत आहेत. 1 जानेवारी रोजी ते पत्नीसोबत गुजरातमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. घर रिकामे असल्याची संधी साधून आरोपींनी घरात प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोकड लंपास केली.
पटेल मुंबईत परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आणि अन्य तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
