मेट्रो ट्रायल रनचा मुहूर्त ठरला, ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी
एकूण 350 शिबिरांचे आयोजन संपूर्ण मुंबईमध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये, 100 शिबिरांमध्ये विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी आणि उपचार करण्यात येतील. तर, 222 तपासणी आणि जनजागृती शिबिरे आरोग्य केंद्र स्तरावर, 102 विशेष शिबीर प्रसूतिगृहे आणि उपनगरीय रुग्णालये असे एकूण 350 शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य- कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' हे अभियान राबवले जात आहेत. फक्त मुंबईतच नाही तर, संपूर्ण देशभरामध्ये हे अभियान राबवले जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित मुंबई महानगर पालिकेने हे अभियान राबवले आहे.
advertisement
विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज?
मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत अभिनयाला सुरूवात करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या दिवशी आयोजित शिबिरांच्या 34 ठिकाणी अनेक महिलांनी लाभ घेतला. शिवाय गर्भवती महिलांना पोषण आहार किटचेही वाटप करण्यात आले. 33 आहार तज्ज्ञांकडून शिबिरामध्ये आई, लहान मुलं आणि मुलांच्या पोषणाविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना डॉक्टरांकडून अनेक सरकारी योजनांबद्दलची माहितीही देण्यात आली.