सत्यमच्या आई-वडिलांनी सांगितले की, आमचा मुलगा सत्यम नेहमी सर्वांना मदत करायचा. आता तो नसला तरी त्याच्या मार्फत कोणाचातरी जीव वाचावा, हेच त्याचे खरं समाधान असेल. या भावनेतून त्यांनी त्याचे दोन्ही मूत्रपिंड, यकृत आणि दोन डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.या अवयवदानामुळे पाच रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे. एका तरुणाचे हृदय थांबले, पण त्याच्या अवयवांमधून पाच नव्या हृदयांची धडधड मात्र सुरू झाली आहे.
advertisement
दुबे कुटुंबाचा हा निर्णय प्रेरणादायी
सत्यमच्या पालकांचा हा धाडसी निर्णय केवळ कौतुकास्पद नाही, तर समाजाला एक नवा विचार देणारा आहे . सत्यम दुबे यांचे नाव आता केवळ स्मरणात नव्हे, तर पाच नव्या जीवांच्या श्वासातही कायम राहील.
सत्यमच्या अवयवदानामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. एका जीवाच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असली, तरी त्याच्या पालकांच्या निःस्वार्थ निर्णयामुळे पाच कुटुंबांत नवजीवनाचे हास्य उमलले आहे. दुबे कुटुंबाचा हा निर्णय प्रेरणादायी ठरत असून, डॉक्टरांपासून ते समाजात सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.
दोन प्रकारचे असते अवयव दान
अवयवदान हे दोन प्रकारचे असते. एक जिवंत अवयवदान आणि दुसरे मृत अवयवदान. जिवंत अवयवदानात व्यक्ती जिवंत असताना कुटुंबातील व्यक्तीला किडनी तसेच इतर काही अवयव दान करू शकतो. पण अन्य कोणाला अवयव दान करू शकत नाही. मृत अवयवदान म्हणजे ब्रेन डेड झालेली व्यक्तीचे अवयव दान. हे मृताच्या कुटुंबाच्या परवानगीने होते
