माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2007 साली घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. सातिवली परिसरात राहणाऱ्या 5 वर्षांच्या गीतादेवी गौतम हिचे चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे गळा आवळून तिचा खून करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा गुन्हा करून फरार झाला होता.
advertisement
आरोपीला कसा आला जाळ्यात?
तब्बल 18 वर्षे हा गुन्हा उघडकीस येऊ शकला नव्हता. बलात्कार करून खून केल्यानंतर नंदलालने नेपाळ गाठले. नंदलालने त्यानंतर काही दिवस नवी मुंबईमध्ये हमालीचे काम केलं, त्यानंतर पुण्यामध्ये काम केलं. यूपी मधल्या सिद्धार्थ नगरमध्ये विट भट्टीवर आपल्या गावापासून दूर राहून काम करत होता आणि याची माहिती सहाय्यक फौजदार रवी पवार यांना मिळाली.
समांतर तपासाने उघडकीस आले सत्य
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उघडकीस न आलेल्या खुनांच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष–2, वसई यांनी जुन्या साक्षीदारांची पुन्हा चौकशी केली, तांत्रिक विश्लेषण केले आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. या तपासात आरोपी उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावात शेतात विट भट्टीवर गाडी चालवण्या चेकाम करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
सापळा रचून अखेर अटक
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सफौज संतोष चव्हाण नेम सायबर पोलीस ठाणे, मिरा-भाईंदर, वसई विरार, पोलीस आयुक्तालय यांनी सापळा रचून उत्तरप्रदेशात जाऊन 10 डिसेंबर 2025 रोजी आरोपी नंदलाल विश्वकर्मा याला अखेर अटक करण्यात आली.
18 वर्षांनंतर पीडितेला न्याय
या अटकेने एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली आहे. कायदा उशिरा का होईना, पण दोषींना सोडत नाही.18 वर्षांचा काळ गेला… पण न्याय हरवला नाही. हा गुन्हा केवळ उकल नाही, तर कायद्याच्या ताकदीचा ठोस संदेश आहे.
