TRENDING:

Vasai Virar Result 2026: भाजपच्या पराभवानंतर राजन नाईकांची पहिली प्रतिक्रिया, निकालाचा आकडा सांगून हितेंद्र ठाकूर यांना डिवचलं

Last Updated:

वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपली सत्ता कायम राखली आहे. तर भाजपला आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.या निकालानंतर भाजपचा आमदार राजन नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vasai Virar Municipal Election 2026 : विजय देसाई, नालासोपारा : वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपली सत्ता कायम राखली आहे. तर भाजपला आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.या निकालानंतर भाजपचा आमदार राजन नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आही. आम्ही एक होतो एका वरून 44 झालो असे म्हणत राजन नाईक यांनी हिंतेंद्र ठाकूर यांना डिवचलं आहे.
vasai virar election result 2026
vasai virar election result 2026
advertisement

वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचा सत्तेचा मार्ग खुला झाला असला तरी भाजपाने मात्र एक वरून दोन आकडी संख्या गाठली आहे. भाजपाची सत्तेची चावी थोडक्यात हुकली असून आम्ही आत्मचिंतन करू. आम्ही एक होतो एका वरून 44 झालो आम्हाला इथल्या शहरातल्या मतदारांनी विरोधी पक्षाची भूमिका वटवायला सांगितली आहे ती भूमिका आम्ही प्रभावीपणे मांडू, असे राजन नाईक यांनी सांगितले आहे.

advertisement

मतदारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे. नालासोपारा वसई-विरारमध्ये जे करदाते आहेत.जो कर भरतात त्यांचा पुरेपूर उपयोग त्यांचा कल्याणासाठी झाला पाहिजे म्हणून आम्ही चांगल यापुढे काम करूय आमचे 44 नगरसेवक या महापालिकेत पहारेकरी म्हणून काम करतील. त्याच बरोबर इथल्या सत्ताधारणा जे महापालिकेत सत्ताधारी म्हणून बसणार आहेत. चांगल्या कामासाठी आमचे नगरसेवक त्यांना सहकारी करतील आणि जनतेचा विरोधात काही का असल तर त्याचा विरोध प्रखरत्याने आवाज उठवतील,असे राजन नाईक यांनी म्हटले.

advertisement

हितेंद्र ठाकूर यांनी मतदार यादीमधील घोळ असल्यामुळे 71 आले. जर घोळ नसता तर शंभरी पार केली असती यावर राजन नाईक यांनी हितेंद्र ठाकूरांवर पलटवार केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

म्हणजे जे एकाहतर निवडून आले ते स्लो नव्हतो का एका प्रभागात आचोळे चे ३ निवडून आले प्रभाग नंबर २१ मध्ये आमचा १ भाजप चा आला स्लो नव्हती तिथे त्यांची मशीन फास्ट होती. आमची स्लो होती का अस कुठे होत नाही. निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण लोकशाही माणणारे आहोत,असे राजन नाईक म्हणाले आहेत.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Result 2026: भाजपच्या पराभवानंतर राजन नाईकांची पहिली प्रतिक्रिया, निकालाचा आकडा सांगून हितेंद्र ठाकूर यांना डिवचलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल