TRENDING:

Vidhan Bhavan fight: पडळकर Vs आव्हाड राड्यावर काय कारवाई करणार? राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भेटायला बोलावलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाचे, हिताचे निर्णय ज्या विधिमंडळात घेतले जातात त्याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यामध्ये कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे. या घटनेबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या राड्यानंतर आता विधानभवनात हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांना भेटायला बोलावलं होतं. त्यानंतर या प्रकरणी अहवाल मागितला आहे, तो वाचून काय कारवाई करता येईल, याची सभागृहात घोषणा करणार, अशी प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली.
News18
News18
advertisement

महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीच घडली नसेल अशी घटना विधिमंडळात घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांना भेटायला बोलावलं होतं. त्यांची बाजू ऐकून घेतली, अशी माहिती समोर आली. त्यानंतर खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भेटायला बोलावलं. या भेटीत काय चर्चा झाली. याची तपशील समोर आली नाही. पण, नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

advertisement

"आज जी घटना विधानभवनात घडली ती अत्यंत दुर्भाग्य पूर्ण आहे, संसदीय लोकशाहीच्या मंदिरात अशी घटना घडणे कदापी स्विकारली जाणार नाही. याबद्दल मी सखोल अहवाल मागितला आहे. तो वाचल्यानंतर कारवाईबद्दलची घोषणा सभागृहामध्ये करेल", अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकरांनी दिली.

हक्कभंग कुणाच्या बाजूने येणार? 

दरम्यान,  विधानभवनामध्ये अशा प्रकारची मारहाण होणं अतिशय गंभीर आहे. विधान भवन आणि त्याचा कामकाजावर महाराष्ट्राची १३ कोटी जनता आदर्श नजरेने पाहत असते. अशा गोष्टीमुळे विधानसभेत कोणीच सुरक्षित राहणार नाही. विधानभवनात आम्ही कायदा सुव्यवस्थे संदर्भात कायदे करतो. कायदा सुव्यविस्तार चर्चा घडवतो. अशा ठिकाणी अशी घटना घडली तर आम्ही चिंता व्यक्त करतो. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की पोलीस, गृह विभाग पोलीस अधिकारी कोणती कारवाई करू. हक्कभंग समितीकडे यासंदर्भातला हक्कभंग दाखल करावा. पाच वर्षांत प्रत्येक अधिवेशन होईल तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकावं, अशी मागणीच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

advertisement

तसंच, अशा घटना पुन्हा होणार नाही. गृह विभागाची कारवाई होईल तर हे एनसी मॅटर आहे. कॅमेऱ्याला प्रत्येक अँगलमधून पाहिलं पाहिजे आणि चूक कोणाची आहे हे पाहून हक्क भंग समितीकडे दाखल करावं, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/मुंबई/
Vidhan Bhavan fight: पडळकर Vs आव्हाड राड्यावर काय कारवाई करणार? राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल