मुंबई : हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. त्यात सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी उद्या म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. या एकादशी निमित्त ही पूजा नेमकी कशी आणि याचे काय महत्त्व आहे, हे आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हशेळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात आणि जर अधिक मास आला तर 26 एकादशी येतात. श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. ही एकादशी उद्या शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी आहे.
Independence Day Special : पुण्यात साकारली ऑलम्पिक आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंची रांगोळी, VIDEO
श्रावणातील पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केले जाते, असे मानले जाते. पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास अपत्य सुख मिळते. हे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते. त्यामुधील एक एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी आहे.
पुत्र प्राप्तीसाठी केली जाणारी एकादशी म्हणून ही पुत्रदा एकादशी आहे. पुराणकाळात महिष्मातीपुरी नावाचा शांत राजा होता. त्याला पुत्र नव्हते. तेव्हा त्याच्या आप्तेष्टांनी राजाला का पुत्र नाही, हे लोमेश ऋषिला विचारले. तेव्हा ऋषी म्हणाले, गेल्या जन्मी हा राजा निर्दयी होता.
बालविवाह रोखण्यासाठी केली चॅम्पियनची नेमणूक, छत्रपती संभाजीनगरमधील हा अनोखा उपक्रम तरी काय?
याने एका नुकत्याच वासराला जन्म दिलेल्या गाईला तळ्यावरून पाणी पिण्यास हटकले आणि त्याला श्राप लागला म्हणून त्याला ह्या जन्मात पुत्र नाही. त्याने प्रायश्चित्त केले तर त्याला पुत्र प्राप्ती होईल. त्याप्रमाणे त्याने प्रायश्चित्त केल्यावर त्याला पुत्र प्राप्ती झाली. म्हणून ही पुत्रदा एकादशी तसेच यादिवशी भगवान विष्णूचे पूजन करावे, त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
व्रत करणाऱ्या व्यक्तीने दशमी तिथीपासून कांदा लसूण त्याग करावा आणि द्वादशीला ब्राम्हणाला दान करूनच उपवास सोडावा, असेही त्यांनी सांगितले.
सूचना - वर दिलेली माहिती ही ज्योतिष, पंडित यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.