हर्षाली थविल केडीएमसीमध्ये महापौर?
केडीएमसीमध्ये मनसेने भाजपला धक्का देत वेगळा गट स्थापन करण्याकरता शिवसेनेला साथ दिली होती. महापौरपदाकरता उमेदवार हर्षाली थविल यांनी श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. तर तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे नगरसेवक राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हर्षाली थविल यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली होती. नगरसेवक टर्ममध्ये शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लडवत सर्वात जास्त मतांनी विजयी उमेदवार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या घरातील भावंडे व भावजई हे सर्वजण प्रशासनात उच्चं पदावर आहेत.
advertisement
10 वर्षांपेक्षा अधिक वकिलीचा अनुभव
मुंबई हायकोर्ट येथे 10 वर्षांपेक्षा अधिक वकिली अनुभव हर्षाली यांना आहे. नगरसेवक म्हणून स्थायी समिती सदस्या म्हणून कामकाज देखील पाहिलं आहे. स्वतःच्या वॉर्डमध्ये, मेडिकल कॅम्प, शिक्षण कोर्स कॅम्प आणि रोजगार कॅम्प आणणं, अशी कामं देखील त्यांनी केलीत. शिवसेना महिला उपशहर संघटक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तर आदर्श नगरसेविका पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.
भाड्याच्या घरात राहतात
दरम्यान, एवढं सर्व निधीमंजूर करून देखील फक्त जनसेवा हेच कर्म, असा नारा त्यांनी दिला होता. स्वतःजवळ ना कोणती चारचाकी, ना मोठं घर, वडिलोपार्जित चाळीतील छोट्याशा खोलीत वास्तव्यास आहेत. अटाळी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली आजही आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहतात.
प्रथम नगरसेवक टर्म मधील उल्लेखनीय कामगिरी -
- आंबिवली उल्हास नदी येथील 15 वर्षांपासून अपूर्ण पडलेला रेल्वे ब्रिज स्वतः मंत्रालय व दिल्ली रेल्वे बोर्ड यांच्या सोबत पाठपुरावा करून ब्रिजचं काम पूर्ण केलं.
- कडमोप च्या इतिहासातील प्रथम नगरसेविका ज्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून 7 कोटींचा विशेष निधी मंजूर करून आणला आणि आपल्या व बाजूच्या वॉर्ड (वडवली व आंबिवली परिसरात ) कामं केली. (उदा. रस्ता, गटार, स्म्शान घाट, ओपन जिम, गलोगली पेवर ब्लॉक रस्ते व नविन बांधकाम साठी नविन पाईप लाईन्स )
- नविन रिंग रूटमध्ये ज्या लोकांची घरे गेली आहेत. त्यांना स्वतः पाठपुरावा करून चांगल्या ठिकाणी हक्काचे घर मिळून दिलं.
- कोरोना काळात घरोघरी जाऊन ज्या ज्या गोष्टीची लोकांना आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः जाऊन पुरवल्या.
