TRENDING:

मला Divorce पाहिजे! बायकोचे शब्द ऐकताच नवऱ्याची सटकली, मुलुंड स्थानकावर केलं भयंकर कांड

Last Updated:

पत्नी पुष्पाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने आता ती छळ सहन करू शकत नाही आणि तिला घटस्फोट पाहिजे अशी मागणी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर वैवाहिक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी राजुकुमार गुप्ता याला पोलिसांनी सूरतमधून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजुकुमार गुप्ता हा इलेक्ट्रिशियन असून त्याने पत्नी पुष्पा गुप्ता हिला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या केली आहे. घटनेनंतर आरोपी आपल्या धाकट्या मुलासह फरार झाला होता. विशेष म्हणजे, या घटनेच्या काही तासांपूर्वीच पुष्पा यांनी पोलिसांकडे तक्रारही दिली होती.
News18
News18
advertisement

मृत महिलेचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता जो सैन्यात जवान आहे याने दिलेल्या तक्रारीनुसार पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. त्यामुळे तो आपल्या बहिणीला आणि तिच्या 15 वर्षीय मुलाला उत्तर प्रदेशमधील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता. 14 मार्च रोजी ते उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत असताना राजुकुमार आणि पुष्पा यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर पुष्पा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढे कमलेश, पुष्पा आणि तिचा 15 वर्षीय मुलगा मुलुंड स्थानकावर पोहोचले.

advertisement

राजूकुमारच्या पत्नीला हवा होता घटस्फोट

दरम्यान, कमलेशला आपले आर्मी ओळखपत्र राजूकुमारच्या घरी राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो आणि त्याचा भाचा ते आणण्यासाठी परत गेले. मात्र संतप्त झालेल्या राजूकुमारने त्यांना घरातच बंद करून ठेवले. घरी पोहोचताच राजू आणि कमलेशमध्ये जोरदार वाद झाला. वाद मारामारीपर्यंत पोहोचला. राजूने लहान मुलाच्या मदतीने कमलेश आणि मोठ्या मुलाला खोलीत बंद केले. नंतर स्वतः लहान मुलासोबत बाहेर पडला. कमलेशने आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले. कमलेश थेट मुलुंड पोलिस ठाण्यात गेला आणि राजूविरुद्ध तक्रार दाखल केली की त्याने महत्वाचे कागदपत्रे चोरली आहेत. पोलिसांनी राजूला ठाण्यात बोलावले, पण राजूने फोन बंद केला.

advertisement

स्टेशनवर नेमकं काय घडलं? 

आरोपी राजूकुमार मुलुंड स्थानकावर आला. पत्नी पुष्पाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने आता ती छळ सहन करू शकत नाही आणि तिला घटस्फोट हवा आहे. या बोलण्यावर संतापलेल्या राजूने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या पत्नीला त्याने तिला काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलले आणि तेथून फरार झाला, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

advertisement

आरोपीविरोधात  गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
reel star ची शूटसाठी आवडती जागा, मुंबईत इथं येईल गोव्यासारखा फील, तुम्ही दिलीये कधी भेट?
सर्व पहा

ही घटना घडल्यानंतर प्रवाशांनी तात्काळ स्टेशन मास्टरला माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने जखमी अवस्थेतील पुष्पा यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कुर्ला जीआरपीने राजुकुमार गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
मला Divorce पाहिजे! बायकोचे शब्द ऐकताच नवऱ्याची सटकली, मुलुंड स्थानकावर केलं भयंकर कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल