व्हायरल व्हिडिओध्ये काय घडलं पाहा?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक महिला तिच्या कुटुंबियासोबत प्रवास करत असते. दरम्यान सकाळची वेळ झाल्याने तिच्या कुटुंबियातील अनेकांनी नाश्तासाठी पार्सल मागवले पण या महिलेने चक्क इलेक्ट्रिकत किटलीत घेतली आणि त्यात चक्क मॅगी बनवण्यास सुरुवात केली.https://x.com/i/status/1991444609076195759
व्हायरल व्हिडिओची मध्य रेल्वेकडून दखल
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, महिला ही रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत होती. ज्या डब्ब्यात प्रत्येकासाठी मोबाईल आणि लॅपटॉप चार्जरसाठी प्लग दिलेले असतात. पण महिलेनी त्याचा गैरवापर केलेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने महिलेवर कारवाई सुरु केली आहे. सध्या या महिलेचा शोध सुरु आहे.
कारवाई का होणार?
ज्या प्लॅगच्या माध्यमातून महिलेने मॅगी बनवली ते अतिशय धोकादायक होते, कारण त्यामुळे शॉटसर्किट होण्याची ही शक्यता होती. रेल्वेमध्ये असलेले हे प्लॅग फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप उपकरणांच्या चार्जिंगसाठी बनवण्यात आलेले असतात. जी घरात इलेक्ट्रिक किटली वापरतो ज्याला उच्च दाबाच्या विद्युत पुरवठ्याची आवश्यकत असते. यामुळे संबंधित महिलेवर कायद्यानव्ये कलम 147 (1) अंतर्गत मध्य रेल्वेने कारवाई सुरू केली आहे.
