मुंबई : श्रावण हा सणांचा महिना. रक्षाबंधनानंतर आता कृष्ण जन्माष्टमीचे वेध लागले आहेत. प्रत्येकाच्याच घरी लड्डूगोपाल म्हणजेच बाळकृष्णाची लहान मूर्ती असते. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीसाठी बाजारात अनेक आर्टिफिशियल पाळणे, सजावटीचे साहित्य, मुकूट उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे फक्त 150 रुपयांपासून वेगवेगळ्या व्हरायटी आणि साइजनुसार मुंबईतील दीनानाथ मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
श्रीकृष्ण भक्तांसाठी जन्माष्टमीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू पंचागानुसार जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यानिमित्ताने जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी लहान बाळाला कृष्णासारखे सजवले जाते. त्याला पाळण्यात बसविले जाते.
लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजूनही खात्यात जमा झाले नाहीत?, ही आहेत त्यामागचे कारणं, आताच वाचा..
त्यामुळे तुम्हालाही आपल्या घरातील बाळ गोपाळांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवायचे असेल तर तुमच्यासाठी मुंबईतील एक ठिकाण बेस्ट पर्याय आहे. मुंबईतील विले पार्लेमधील दीनानाथ मार्केटमध्ये वेगवेगळे डिझाईन आणि लहान ते मोठ्या आकाराचे पाळणे 150 रुपयांपासून ते पाळण्याच्या निवडक आकारानुसार स्वस्थ दरात मिळतात.
ऑगस्टमध्ये बसतोय वाढत्या तापमानाचा तडाखा, छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक उन्हाने हैराण
यामध्ये सागाच्या लाकडाचे पाळणे, तांब्या धातूचे डिझाईन केले पाळणे, मोरपंख असलेले पाळणे असे बरेच वेगवेगळे प्रकार येथे अगदी बजेट फ्रेंडली दरात मिळतात. त्यामुळे तुमच्यासाठी हे ठिकाण एक चांगला पर्याय ठरू शकते.