ऑगस्टमध्ये बसतोय वाढत्या तापमानाचा तडाखा, छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक उन्हाने हैराण

Last Updated:

गेल्या आठवड्यात 16 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला 33 अंश तापमान नोंदले गेले होते. 17 ऑगस्टला पारा 29 अंशांनी खाली आला. मात्र, त्यानंतर तापमानाची चढती कमान बघायला मिळाली.

फाईल फोटो
फाईल फोटो
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. शहरात दिवसभर कडक उन पडते आणि रात्री पाऊस होतो. ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू होण्याआधीच तापमानाने ऑक्टोबर हीटसारखाच तडाखा दिला आहे. काल गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान तब्बल 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पावसाची स्थिती असली तरी सुद्धा पावसाचा पत्ता नाही, अशी स्थिती मागील आठवडाभर पाहायला मिळाली. यानंतर गेली 2 दिवस शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे तापमान थोडे नियंत्रणात आल्यासारखे वाटत असतानाच बुधवारपासून उन्हाने तडाखा द्यायला सुरुवात केली. कडक उन्हाचे चटके शहरवासीयांना बसत आहेत.
advertisement
साधारणपणे सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस होऊन गेल्यावर शहरात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असतो. त्यावेळी तापमान 33 ते 36 अंशांच्या आसपास बघायला मिळते. पण, 22 ऑगस्टलाच तापमानाने ऑक्टोबर हिटची पातळी गाठल्याने कडक ऊन आणि असह्य उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले होते.
नाशिकमध्ये होमगार्ड भरती, 6 दिवस सर्व्हिस रोड राहणार बंद, असा आहे पर्यायी मार्ग
गेल्या आठवड्यात 16 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला 33 अंश तापमान नोंदले गेले होते. 17 ऑगस्टला पारा 29 अंशांनी खाली आला. मात्र, त्यानंतर तापमानाची चढती कमान बघायला मिळाली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 4 ते 5 दिवसांत ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळतील. पण, वातावरणातील उकाडा आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे.
advertisement
काय घ्यावी काळजी? -
अचानक तापमान वाढल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. अशावेळी ताजी फळे, पालेभाज्यांचा वापर आहारात करावा. गरम व जड अन्नपदार्थ टाळावे. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. गाजर, काकडी, कच्चा पांढरा कांदा शरीराला थंडावा देतात. जेवणात गरम मसाले, तिखटाचा वापर कमी करा. फ्रीजमध्ये ठेवलेल्या गारेगार पाण्याचा शरीरावर मारा करू नका.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऑगस्टमध्ये बसतोय वाढत्या तापमानाचा तडाखा, छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक उन्हाने हैराण
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement