नाशिकमध्ये होमगार्ड भरती, 6 दिवस सर्व्हिस रोड राहणार बंद, असा आहे पर्यायी मार्ग
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिकमध्ये होत असलेल्या होमगार्ड भरतीमुळे सर्व्हिस रोड बंद ठेवण्यात आला आहे.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : होमगार्ड भरतीमुळे मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्तावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात अली आहे. या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार होणार नाही, यासाठी तसेच आता सर्व्हिस रोडवरील वाहतूकही 6 दिवस बंद राहणार आहे.
त्या करीता भुजबळ नॉलेज सिटी ते सावंत महाराज चौफुली पर्यंत येत्या मंगळवारपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. गृहरक्षक दल भरती प्रक्रियेमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून जारी करण्यात आली आहे.
advertisement
साताऱ्यातील 150 शेतकरी राबवतायेत "रानभाज्या घरपोच सुविधा" हा अनोखा उपक्रम, काय आहे यामागची संकल्पना?
आडगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर 22 रोजी सकाळी सहा वाजेपासून गृहरक्षक दलाच्या जवानांची भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरवात करण्यात अली आहे. या चाचणीअंतर्गत स्त्री-पुरुष उमेदवार 800 ते 1600 मीटर धावणार आहेत. या प्रक्रियेमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
advertisement
Ganeshotsav 2024 : सजावटीसाठी इको फ्रेंडली सेटला पसंती, साताऱ्यात 500 रुपयांपासून ते 22 हजार पर्यंतचे मखर उपलब्ध, VIDEO
हा नियम काल गुरुवापासून ते येत्या मंगळवापर्यंत पहाटे 5 वाजेपासून दुपारी 4 पर्यंत जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई-आग्रा सर्व्हिस रोड धुळ्याकडे जाणारी वाहने भूजबळ नॉलेज सिटी प्रवेशद्वारापासून पुढे न जाता पोलीस मुख्यालय ते मेडिकल कॉलेज मार्गे चौफुली पर्यंत वळविण्यात आली आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 23, 2024 12:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये होमगार्ड भरती, 6 दिवस सर्व्हिस रोड राहणार बंद, असा आहे पर्यायी मार्ग