साताऱ्यातील 150 शेतकरी राबवतायेत "रानभाज्या घरपोच सुविधा" हा अनोखा उपक्रम, काय आहे यामागची संकल्पना?

Last Updated:

प्रगतशील शेतकरी दयानंद पवार यांनी याबाबत माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. रानभाज्यांचा हा अनमोल ठेवा डोंगराळ आणि दुर्गम भागातून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरपोच रानभाज्या हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

+
प्रगतशील

प्रगतशील शेतकरी दयानंद पवार

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : आतापर्यंत आपण अनेक घरपोच सेवांबाबत ऐकल असेल आणि पाहिलं देखील आहे. मात्र, तुम्ही कदाचित रानभाज्यांची म्हणजेच रानमेव्याच्या घरपोच सेवेबद्दल ऐकले नसेल. पण साताऱ्यातील 100 ते 150 हून अधिक शेतकरी एकत्र येऊन रानमेवा, रानभाज्यांची घरपोच सेवा करत आहेत. यामध्ये किती प्रकाराच्या रानभाज्या मिळतात, त्याची किंमत काय? त्याच्या औषधी गुणधर्म काय? याबद्दलची आणि त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
advertisement
प्रगतशील शेतकरी दयानंद पवार यांनी याबाबत माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. रानभाज्यांचा हा अनमोल ठेवा डोंगराळ आणि दुर्गम भागातून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरपोच रानभाज्या हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सातारा, जावली, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा आणि कोरेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोजच्या खाण्यात येणाऱ्या भाज्यांमध्ये रासायनिक खते आणि औषध यांचा वापर करून त्यांना लवकरात लवकर निर्माण केले जाते. त्यामुळे कळत-नकळत या अशा प्रकारच्या भाज्या शरीराला हानिकारक आहेत.
advertisement
अशा हानिकारक भाज्या शरीरामध्ये जाऊ नये, यासाठी नैसर्गिकरित्या उगवलेल्या आणि कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत, ना कोणते औषध वापरता नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रानभाज्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, जास्तीत जास्त लोकांनी या रानभाज्या खाव्या, यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यातून या रानमेव्याने ग्राहकांचं वेधले लक्ष -
यामध्ये कटिले, अळंबी, आघाडा, अमरकंद, आचकंद, कोवळे बांबू, बांबूचे कोंब, महाळुंग, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, कुसरा, कुई, भुईपालक, घोळ, तरोटा, कुरडू, गुळवेल, अंबाडी भाजी भाकरी, कासली, फांग, अरवी, तांदुळ कुंद्रा, काळा म्हैस वेल, चवळीच्या डेऱ्या, चिवळ, सराटा, बडकी, लोधी, वागोटी, हळंदा, आळूचे पान, समिंद शोक पानं, गावरान लसून, कांदा, अशा विविध प्रकारच्या 70 ते 75 होऊन अधिक रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील हा आहे खूपच हाय प्रोफाईल एरिया, जागेची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही..
आपण जर पाहिले तर उन्हाळा संपता संपता पावसाळा सुरू झाल्यानंतर दैनंदिन खाण्यात येणाऱ्या भाज्यांचे दर गगनाला भिडलेले असतात. अशा वेळेला रानभाजी ही फार मोठ मोलाचे काम करत आहे. शेतकरी ही रानभाजी सर्वसामान्य भाजीच्या दराने विकण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, काढणी आणि घरपोच सेवा यासाठी येणारा खर्चामुळे 10 ते 15 रुपये जादा घ्यावे लागत असणाऱ्या शुल्काची कल्पना ग्राहकांना शेतकरी देतात. तर रानभाज्या खाणारे ग्राहकही समाधान व्यक्त करत आहेत, अशी माहिती शेतकरी देतात.
advertisement
रानभाज्यांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये रानभाजीत इंटरेस्ट दाखवत आहेत. हा दुर्मिळ ठेवा गोळा करत असताना रानभाज्यांचे संवर्धन करून ज्या ज्या भाज्या आहेत, त्या भाज्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. या अनोख्या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्याची तब्बल 100 ते 150 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. रानभाज्यांचे उपलब्धतेबरोबर स्थानिक लोकांच्या मागणीनुसार शेतकरी रानभाज्या घरपोच देत आहेत, अशी सातारा जिल्ह्यातून जर मागणी होत असेल तर यासाठी कृषी अधीक्षक कार्यालय सातारा यांच्याशी संपर्क साधून सर्व ग्राहकांना घरपोच सेवा देणार, अशी माहिती शेतकरी दयानंद पवार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
साताऱ्यातील 150 शेतकरी राबवतायेत "रानभाज्या घरपोच सुविधा" हा अनोखा उपक्रम, काय आहे यामागची संकल्पना?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement