लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजूनही खात्यात जमा झाले नाहीत?, ही आहेत त्यामागचे कारणं, आताच वाचा..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर होऊन सुद्धा अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे यामागे नेमकी काय कारणे आहेत, तेच आपण जाणून घेऊयात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये अनेकांच्या 17 तारखेला जमा झाले. मात्र, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर होऊन सुद्धा अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे यामागे नेमकी काय कारणे आहेत, तेच आपण जाणून घेऊयात.
तुमच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याची प्रमुख दोन कारण आहेत. पहिले म्हणजे तुमचे आधार कार्ड इतर कोणत्यातरी बँक अकाउंटला लिंक असल्यामुळे तुम्हाला पैसे येऊ शकलेले नाहीत. अनेकांनी लाडकी बहीण योजनेसाठी बँक मध्ये नवीन अकाउंट खोलले. मात्र, पूर्वी कोणत्यातरी बँकेत खात असल्यामुळे तुमचा आधार कार्ड तिथेच लिंक असेल. त्यामुळे तो नवीन खात्यामध्ये लिंक झालेला नाही आणि म्हणूनच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. दुसरे कारण म्हणजे तुम्ही फॉर्म उशिरा भरला असेल आणि त्यामुळे तो प्रोसेस मधून बाहेर गेलेला असू शकतो.
advertisement
आता पुढे काय करावे -
तुमचे आधार नक्की कोणत्या बँक खात्याला लिंक आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही युडीआयचा वापर करू शकता. तिथे जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड कोणता बँकेची लिंक आहे, ते पाहू शकता. जर तुमचे आधार कार्ड आधीच्या बँक खात्यासोबत लिंक असेल तर लगेचच लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर एडिट करून जुन्या खात्याची माहिती भरा किंवा बँकेत किंवा पोस्टात जाऊन नवीन खात्यासोबत आधार कार्ड नंबर लिंक करा. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतरच तुम्हाला तुमचे तीन हजार रुपये मिळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2024 2:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजूनही खात्यात जमा झाले नाहीत?, ही आहेत त्यामागचे कारणं, आताच वाचा..