advertisement

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर नवा ट्वीस्ट, सुनील तटकरेंच्या वक्तव्याने वाढवला सस्पेन्स, विलीनीकरणावर...

Last Updated:

NCP Merger: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर नवा ट्वीस्ट, सुनील तटकरेंच्या वक्तव्याने वाढवला सस्पेन्स, विलीनीकरणावर...
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर नवा ट्वीस्ट, सुनील तटकरेंच्या वक्तव्याने वाढवला सस्पेन्स, विलीनीकरणावर...
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या पक्षाच्या विलीनीकरणावर जोरदार चर्चा झडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला आहे. सुनिल तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीती संगम येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आणि दादांनी आम्हाला दिलेला विचार हे पुढे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरु ठेवण्याच्या कर्तव्याच्या भावनेतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आल्याचे तटकरे यांनी सांगितले. उद्याच्या महाराष्ट्रासाठीचे योगदान सुनेत्रा पवार देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement

>> विलीनीकरणावर भाष्य काय केलं?

विलीनीकरणाच्या प्रश्नांवर सुनिल तटकरे यांनी म्हटले की, आज आम्ही एनडीमध्ये सत्तेत आहोत. एनडीएच्या विचारांशी जे सुसंगत आहे ज्यांना एनडीमध्ये यायचं त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर अधिक स्पष्टता येईल असं सूचक विधान तटकरेंनी केलं.
अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अजित पवारांनी एनडीए मध्ये निर्धारपूर्वक सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावर विधानसभा निवडणूक विजयाने शिक्कामोर्तब झालं आहे. प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतात . संजय राऊत यांची देखील टीका यापेक्षा वेगळी नसणार असेही तटकरे यांनी म्हटले.
advertisement
तटकरे यांनी पुढे म्हटले की, विलीनीकरण बाबत चर्चा होत असली तरी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. शशिकांत शिंदे यांनी भावनिक होऊन प्रतिक्रिया दिली. त्याबाबत अधिक कळलं तर नक्की बोलता येईल, असेही तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजित दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे .त्यामुळे नेता निवडण्याचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आम्ही एनडीए सोबत आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
advertisement
भाजप हा केंद्रातील आणि राज्यातील मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्ष हा मित्र पक्ष म्हणून त्याचा सोबत आहे. भाजपने आम्ही काय निर्णय घ्यावे हे कधी ही सांगितलेले नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. आमचे निर्णय आम्ही घेऊ असेही त्यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर नवा ट्वीस्ट, सुनील तटकरेंच्या वक्तव्याने वाढवला सस्पेन्स, विलीनीकरणावर...
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement