TRENDING:

मराठीत स्टँडअप poetry रुजवणारा अपूर्व बनला तरुणाईच्या गळ्यातील ताईत, कोण आहे हा तरुण?

Last Updated:

आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जो आपल्या कलेच्या जोरावर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पियुष पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : कविता, गझल किंवा कुठलीही कला ही आपल्या उदरनिर्वाहचे साधन होऊ शकते, याबद्दल आपल्याकडे आजही साशंकताच आहे. मात्र, काही ध्येयवेडे कलाकार या समजाला छेद देतात आणि आपल्या कलेच्या जोरावर अशी काही झेप घेतात की संपूर्ण समाजालाच आपल्या कलेचं वेड लावतात. आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जो आपल्या कलेच्या जोरावर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

advertisement

अपूर्व राजपूत असे या तरुणाचे नाव आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणी येथील सोयगाव येथील हा रहिवासी आहे. त्याने आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावर कवितेची गुंफण अशी काही केली की, अल्पावधीतच महाराष्ट्राचा लोकप्रिय कवी म्हणून तो उदयाला आला आहे. अपूर्व करत असलेल्या कविता, मराठी गझल, मुशायरा हे काव्यप्रकार तरुणांना भुरळ घालणारे आहेत.

पावसाळ्यात ताडपत्रीची चिंता, याठिकाणी मिळणार दर्जेदार उत्पादन, जाणून घ्या, दर अन् ठिकाण

advertisement

अपूर्वच्या हिंदी-मराठी एकत्रित गझल लोकप्रिय होत आहेत. 'मध्यांतर' या त्याच्या कवितेच्या कार्यक्रमांचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या पंधराहून अधिक ठिकाणी त्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याने अपूर्वने मराठी कविता जगताला एक नवीन ओळख करून दिली आहे, ते म्हणजे 'स्टँडअप पोएट्री'.

यामध्ये एकच कलाकार कविता, मुशायरा आणि गोष्टी सादर करतो. महाराष्ट्रतला अपूर्व अशा पद्धतीचा कार्यक्रम करणारा एकमेव कवी आहे. स्टँडअप पोएट्री आधी हिंदीत आणि इंग्रजीत प्रसिद्ध असायचे, ते अपूर्वने जसेच्या तसे मराठीत आणलेच नाही तर त्याचे मराठीकरण करून तो ते आपल्या भाषेत सादर करतो आहे आणि तरुणाई त्याच्या या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देत आहे.

advertisement

Satara Police Bharti 2024 : बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय टळणार, याठिकाणी झाली राहण्याची सोय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

त्याच्या या प्रवासाबाबत बोलताना अपूर्व सांगतो की, सुरुवातीला मला खरचं इतकं काही करू शकेन, असं वाटलं नव्हतं. हळूहळू या क्षेत्रात कामं करत गेलो, तसं लोकांचा प्रतिसाद मिळत गेला. माझं गाव सोयगाव आहे. सुप्रसिद्ध कवी ना. म. धानोरकर यांच्या गावातून मी येतो. अर्थातच हा वारसा माझ्यामध्ये पुढे रुजत गेला. अजून खूप पुढे जायचं आहे. आपल्या कवितेतून असंख्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा अपूर्व कार्यक्रमाच्या शेवटी रंगमंचासाठी आपलं आयुष्य समर्पित करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मराठीत स्टँडअप poetry रुजवणारा अपूर्व बनला तरुणाईच्या गळ्यातील ताईत, कोण आहे हा तरुण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल