काही विद्यार्थ्यांनी अक्षरश: खिडक्या तोडून बेडशीट, दुपट्टा जे मिळेल ते वापरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. दुपारी विमान जेव्हा हॉस्पिटलच्या हॉस्टेलला धडकलं तेव्हा मेसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आगीत होरपळून अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदाबाद A171 विमान दुर्घटनाग्रस्त होताच, मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये देखील आगीचा भडका उडाला.
advertisement
आतापर्यंत या दुर्घटनेत 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 241 प्रवासी होते. 33 मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक जण अजूनही जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भयंकर होता की त्यानंतर मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची काय अवस्था झाली ते या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अक्षरश: आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ मेडिकल कॉलेच्या हॉस्टेलमध्ये दिसत आहेत.
अहमदाबाद प्लेन क्रॅशचा हा नवा व्हिडीओ मन विचलित करणारा आहे. जीव वाचवण्यासाठी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी अक्षरश: धडपड करत आहेत. बी. जे मेडिकल हॉस्टेलमध्ये विमान अपघातानंतर लागलेल्या आगीनं हाहाकार उडाला होता. अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. काही जणांना जीव वाचवण्यात यश आलं, काही विद्यार्थ्यांना मात्र आपला जीव गमवण्याची वेळ आली. या दुर्घटनेचे नवे व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहेत.