अहमदाबादहून हे विमान लंडन गेटविकला निघालं होतं. विमानामध्ये असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिस आणि 1 कॅनडाचा नागरिक होता, तसंच दोन लहान मुलंही या विमानातून प्रवास करत होती. या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असल्याची माहितीही समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मागच्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्येच होतं.
advertisement
रहिवासी भागाचंही नुकसान
अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर हे विमान रहिवासी भागातल्या एका हॉस्पिटलवर जाऊन कोसळलं, त्यामुळे रुग्णालयातील 10 ते 12 डॉक्टरही जखमी झाले आहेत. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी एक सरकारी रुग्णालय होते. या सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळले, तिथे जेवणाची मेस देखील होती.
विमान कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. तसंच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.