या विमान अपघातात अर्जुनभाई मनुभाई पाटोलिया यांचाही मृत्यू झाला आहे. अर्जुनभाई हे आपल्या दोन मुलांना लंडनमध्ये सोडून पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी आपल्या पत्नीची शेवटची इच्छाही पूर्ण केली. मात्र पुन्हा आपल्या मुलांकडे लंडनला जात असताना अर्जुनभाई यांचा वाटेतच मृत्यू झाला. या विमान अपघातात जे २४१ जण मृत पावले त्यात अर्जुनभाई पाटोलिया यांचाही समावेश होता. अर्जुनभाई यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
लेकरं लंडनमध्ये अडकली, बापाचा विमान अपघातात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनभाई पाटोलिया हे मूळचे गुजरातमधील वाडीया येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते लंडनमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. आपल्यावर मायदेशात अत्यंसंस्कार व्हावेत, अशी अर्जुनभाईंच्या पत्नीची इच्छा होती. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनभाई आपल्या दोन मुलांना लंडनमध्ये सोडून भारतात आले होते. त्यांनी पत्नीच्या इच्छेनुसार, तिच्यावर अंत्यसंस्कारही केले.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. गुरुवारी १२ जूनला झालेल्या विमान अपघातात अर्जुनभाईंचा मृत्यू झाला. या निधनामुळे वाडीयामध्ये शोककळा पसरली आहे. शोकाकुल नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आठवणींचा ओझं घेऊन आणि कर्तव्य पार पाडून ते आपल्या मुलांकडे परतण्यासाठी १२ जून २०२५ रोजी एअर इंडिया फ्लाइट AI171 मध्ये बसले, पण नियतीने क्रूर खेळ केला.