TRENDING:

Air India Plane Crash : विमानातील 11A सीट लकी? जिथे भयानक अपघातात 241 जणांचा मृत्यू, तिथे तो एकटाच वाचला

Last Updated:

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये फक्त एक प्रवासी बचावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये फक्त एक प्रवासी बचावला आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी ही माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या या विमानात सीट नंबर 11 A वर हा प्रवासी बसला होता. विश्वास कुमार रमेश असं या प्रवाशाचं नाव असून ते 40 वर्षांचे आहेत. विश्वास कुमार रमेश हे ब्रिटीश नागरिक असून मागच्या काही दिवसांपासून ते कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (वय 45) यांच्यासोबत भारतात आले होते.
विमानातील 11A सीट लकी? जिथे भयानक अपघातात 241 जणांचा मृत्यू, तिथे तो एकटाच वाचला
विमानातील 11A सीट लकी? जिथे भयानक अपघातात 241 जणांचा मृत्यू, तिथे तो एकटाच वाचला
advertisement

'टेक ऑफच्या 30 सेकंदांनंतर विमानातून मोठा आवाज आला आणि विमान कोसळलं. काही कळायच्या आतमध्येच सगळं घडलं', अशी प्रतिक्रिया विश्वास यांनी दिली आहे. विमान अपघातामध्ये विश्वास यांची छाती, डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे.

'मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच पडला होता. मी बराच घाबरलो आणि तिथून पळायला लागलो. माझ्या बाजूला विमानाचे तुकडे पडले होते. मला कुणीतरी पकडलं आणि ऍम्ब्युलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणलं', असं विश्वास यांनी सांगितलं आहे. मागच्या 20 वर्षांपासून विश्वास लंडनमध्ये राहत आहेत, विश्वास यांची पत्नी आणि मुलगाही लंडनमध्येच आहेत.

advertisement

'माझा भाऊ अजय दुसरीकडे बसला होता. आम्ही दिवला जाऊन आलो होतो. तो माझ्यासोबतच प्रवास करत होता, पण आता तो सापडत नाहीये. माझ्या भावाला शोधा', असं आवाहन विश्वास यांनी केलं आहे. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर असे 242 जण होते. या 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash : विमानातील 11A सीट लकी? जिथे भयानक अपघातात 241 जणांचा मृत्यू, तिथे तो एकटाच वाचला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल