TRENDING:

Ahmadabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात 50 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Last Updated:

Ahmadabad Plane Crash Live Video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. या अपघातात तब्बल ५० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ahmadabad Plane Crash Live Video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी विमानातून तब्बल २३२ प्रवासी आणि १० केबिन क्रू असे एकूण २४२ जण प्रवास करत होते. हे विमान एअर इंडियाचं असून ते अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं जात होतं. मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत हा अपघात घडला.
News18
News18
advertisement

या अपघातात आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ हा मोठा अपघात झाला. विमानतळाशेजारील मेघानी नगरमध्ये एअर इंडियाचे विमान उड्डाणादरम्यान कोसळले. हे आंतरराष्ट्रीय विमान अहमदाबादहून लंडनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्वत्र धुराचे लोट दिसत होते आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

advertisement

अपघातानंतर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. असे सांगितले जात आहे की विमान जिथे कोसळले ते मेघानी नगर हे निवासी क्षेत्र आहे आणि अशा परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. विमानतळापासून मेघानी नगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

advertisement

या विमानात 242 प्रवासी होते. 10 क्रू मेंबर, 2 लहान मुलं, 232 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचं AI 171 विमान आज दुपारी क्रॅश झालं. विमानाचा मागचा भाग कोणत्या तरी गोष्टीला धडकल्याचं सांगितलं जात आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.

मराठी बातम्या/देश/
Ahmadabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात 50 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल