'मी अपघाताच्या एक दीड तासापूर्वीच विमानातून उतरलो होतो. मी दिल्लीहून अहमदाबादला आलो. मी, माझे वडील आणि माझा मित्र या विमानात होतो. विमानात काही खटकणाऱ्या गोष्टी मला जाणवल्या. मला एव्हिएशन क्षेत्रातील माहिती आहे. विमानातील एसी नीट चालत नव्हता. टेक ऑफनंतरही कॉमप्रेसर ऑन ऑफ होत होता. लोक मॅगझिनने स्वत:ला वारा घालत होते. टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या वेळी मी डाव्या बाजूला इंजिनच्या इकडे बसलो होतो, त्याचे फ्लॅप्स पाहूनही मला काही गोष्टी खटकल्या. मी त्याचे फोटो आणि त्याचे व्हिडिओही काढले', असं आकाश वत्स म्हणाला आहे.
advertisement
'फ्लाईटच्या कॅप्टनने घोषणा केली, की अहमदाबादमधील वातावरण चांगलं आहे, पण लॅण्डिंगच्या शेवटच्या टप्प्यात टर्ब्युलन्स होईल. वातावरण चांगलं असेल तर लॅण्डिंगच्या शेवटच्या टप्प्यात कोणता टर्ब्युलन्स येतो? कोणतेही ढग नाहीत, वातावरण चांगलं होतं, उन्ह पडलं होतं, मग टर्ब्युलन्स कसा येऊ शकतो? हे मला समजलं नाही', अशी प्रतिक्रिया आकाश वत्स याने दिली आहे.
विमान प्रवाशांनी भरलेलं होतं. 10 वाजून 7 मिनिटांनी आमच्या विमानाने दिल्लीहून टेक ऑफ केलं होतं. 11 वाजून 15 मिनिटांनी आम्ही अहमदाबादमध्ये लॅण्ड केलं, अशी माहिती आकाश वत्स यांनी दिली आहे.