प्रतिक जोशी यांच्या पत्नी कोमी व्यास या डॉक्टर आहेत. लंडनमध्ये नवीन सुरूवात करण्यासाठी डॉ. कोमी व्यास यांनी दोनच दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. प्रतिक आणि कोमी यांना तीन मुलं आहेत, ज्यात दोन जुळ्या मुली या 5 वर्षांच्या आहेत.
नव्या प्रवासाचा करुण अंत
संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या उद्देशाने या विमानात बसलं होतं. पत्नी आणि मुलांना लंडनमध्येच सेटल करण्याचं स्वप्न प्रतिक मागची कित्येक वर्ष बघत होते, पण नियतीने घात केला आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंद दुःखात बदलला.
advertisement
विमान अपघाताची माहिती समोर येताच प्रतिक जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांना ओळखणाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये राजस्थानमधील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानातील बांसवाडा येथील प्रतिक जोशी कुटुंबातील पाच जण, उदयपूरमधील 4 जण आणि बालोत्रा येथील खुशबू राजपुरोहित यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. उदयपूर शहरातील संगमरवराचे व्यापारी पिंकू मोदी यांचा 24 वर्षीय मुलगा शुभ आणि 22 वर्षीय मुलगी शगुन मोदी यांच्याव्यतिरिक्त रुंदेडा गावातील वरदी चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया यांचाही मृत्यू झाला आहे.