ANI ने दिलेल्या वृत्तानुसार एअर इंडियाचे हाँगकाँगहून दिल्लीला जाणारे विमान AI315 हे विमान हवेत तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटला आढळून आल्यानंतर ते हाँगकाँगला परतले. AI315 ड्रीमलाइनर विमानात पायलटला काही तांत्रिक अडचणी जाणवू लागल्याने त्याने तातडीनं विमान पुन्हा हाँगकाँगला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरने चालवलेले हे विमान हाँगकाँगहून दिल्लीसाठी निघालं होतं. मात्र अचानक माघारी गेलं आहे. यामागचं अद्याप कारण समजू शकलं नाही.
advertisement
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
विमान अपघातात 17 मराठी माणसांनी गमावले जीव, नावाची संपूर्ण यादी समोर
काही तांत्रिक अडचणी असल्याने लॅण्डिंग करण्यात अडचणी आल्या असाव्यात त्यामुळे परतल्याचे देखील म्हटले जात आहे. याबाबत एअर इंडियाने अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरले. दरम्यान, तांत्रिक समस्येचे स्वरूप अद्याप कळलेले नाही.