TRENDING:

11A सीटनंबरवर बसलेल्या प्रवाशाचा कसा जीव वाचला? पीएम मोदी आणि कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच सांगितलं, पाहा VIDEO

Last Updated:

एअर इंडियाचं AI171 विमान 12 जून रोजी अपघातग्रस्त झालं, ज्यात 265 जणांचा मृत्यू झाला. फक्त विश्वास कुमार रमेश वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली आणि जखमींची भेट घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद: टेकऑफ केल्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. एअर इंडियाचं AI171 विमान 12 जून रोजी दुपारी अपघातग्रस्त झालं. या दुर्घटनेत क्रू मेंबर्स, प्रवासी आणि आसपासच्या परिसरातील मिळून 265 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याविमानातून 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी एक प्रवाशाचा जीव वाचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघातग्रस्त झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांचीही भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचीही चौकशी केली.
News18
News18
advertisement

विमान अपघातातून आपण कसं वाचलो हे विश्वास कुमार रमेश याने पीएम मोदींना सांगितलं. विश्वास कुमार रमेश नेमके काय घडले आणि तो कसा वाचला तो संपूर्ण प्रसंग सांगितला. त्याने जे सांगितलं ते अंगावर काटा आणणारं होतं. डोळ्यादेखत मृत्यू पाहिला, संपूर्ण थरार त्याने अनुभवला. विश्वास कुमार म्हणाला, माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडलं, मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जिवंत बाहेर पडलो. क्षणभरासाठी मला अगदी असंच वाटलं माझा मृत्यू अटळ आहे.

advertisement

मी डोळे उघडले तेव्हा मी माझा सीटबेल्ट काढला आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. उड्डाणानंतर फक्त 5-10 सेकंदांनी विमान अडकल्यासारखे वाटलं. मग अचानक विमानातील लाईट ब्लिंक व्हायला लागले. विमानाचा वेग वाढला आणि अचानक कोसळलं. मी ज्या बाजूला होतो तो भाग वसतीगृहाच्या बाजूला नव्हता. मोकळ्या बाजूला विमानाचा भाग होता. तिथून बाहेर पडण्यासाठी मी धडपडत होतो. तिथे इमर्जन्सी डोअर होते. ते तुटलं होती, जमीन सपाट असल्याचं दिसत होतं. मी तिथून उडी मारली आणि बाहेर आलो. माझ्या विरुद्ध बाजूला जो भाग आदळला तिथे प्रचंड नुकसान झालं होतं. तिथं कुणीच वाजू शकलं नसतं. या सगळ्यादरम्यान माझा हात भाजला होता.

advertisement

विश्वासवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आपला जीव कसा वाचवला ते सांगितल्यानंतर अंगावर काटा आला. मी जेव्हा पाहिलं तेव्हा चारही बाजूला मृतदेह पडलेले होते. मी मात्र वाचलो होतो. मी झटकन उडी मारुन तिथून बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर मला मदत मिळाली. दुसरा जन्मच त्याला जगायला मिळाला असं म्हणावं लागले. 242 पैकी फक्त तो एकटाच वाचला 241 प्रवासी ठार झाले. अनेकजण जखमी झाले आहेत. हा अपघात भीषण होता. यामागचं अद्याप कारण समजू शकलं नाही. मात्र इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असं सांगितलं जात आहे.

advertisement

तब्बल 16 तासांनंतर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्या ब्लॅकबॉक्समधूनच नेमकं शेवटच्या काही सेकंदात काय घडलं ते समजू शकतं. त्यानंतरच अपघात कसा झाला याचा उलगडा होऊ शकतो. सध्या या प्रकरणाची प्रशासनाकडून देखील सखोल चौकशी केली जात आहे.

मराठी बातम्या/देश/
11A सीटनंबरवर बसलेल्या प्रवाशाचा कसा जीव वाचला? पीएम मोदी आणि कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच सांगितलं, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल