TRENDING:

इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात, तिकडे थोडक्यात वाचले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री

Last Updated:

अजित पवार यांच्या Learjet 45 विमानाचा बारामतीजवळ अपघातात मृत्यू, महाराष्ट्रात शोक; जयपूरमध्ये AI-1719 विमानाचा गो-अराउंडमुळे मोठा अनर्थ टळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
देशभरातील राजकारणाला हादरवणारी बातमी आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार बारामतीला पोहोचणार होते. त्यांचं विमान लॅण्ड होण्याआधीच काही अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात या घटनेमुळे खळबळ उडली आहे. अजितदादांची अकाली एक्झिट आणि राज्यभरात आक्रोशाचं वातावरण आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास करण्यासाठी यंत्रणा पोहोचली आहे. हे सगळं घडत असताना दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री अगदी थोडक्यात बचावले आहेत.
News18
News18
advertisement

२८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्रासाठी काळी ठरली. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि त्यानंतर काही तासांतच जयपूर विमानतळावर एका मोठ्या विमान अपघाताची टांगती तलवार होती. एअर इंडियाचे विमान लँडिंग करताना फेल झालं, ज्यामध्ये राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह १३५ प्रवासी स्वार होते.

जयपूरमध्ये काय घडला थरार?

advertisement

एअर इंडियाचे विमान (AI-1719) दिल्लीहून दुपारी १:०५ वाजता जयपूर विमानतळावर उतरणार होते. विमान लॅण्डिंग करणार होतं. अनस्टेबल अप्रोचमुळे वैमानिकाने लँडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. धावपट्टीला येताच विमानाने पुन्हा हवेत झेप घेतली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. प्रवाशांनी श्वास रोखला, हृदयाची धडधड वाढली. १० मिनिटे हे विमान जयपूरच्या आकाशात घिरट्या घालत होते आणि अखेर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात यश मिळालं.

advertisement

काय आहे गो-अराउंड?

तांत्रिक भाषेत जेव्हा वैमानिकाला लँडिंग सुरक्षित वाटत नाही, तेव्हा तो विमान पुन्हा हवेत उडवतो, यालाच 'गो-अराउंड' म्हणतात. हा एक सुरक्षा प्रोटोकॉल आहे जो आज मोठा अनर्थ टाळण्यासाठी कामी आला.

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र सुन्न

या घटनेच्या काही तास आधीच बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'लिअरजेट ४५' (Learjet 45) या विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात विमानाने पेट घेतला आणि अजित पवारांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित दादा आगामी बजेट आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते.

advertisement

मृतांची नावे:

अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

विदीप जाधव (सुरक्षा रक्षक, PSO)

कॅप्टन सुमित कपूर (पायलट)

कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी भांडवलात सुरू करा शेळी पालन व्यवसाय, मिळेल नफाच नफा, संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

पिंकी माळी (क्रू मेंबर)

मराठी बातम्या/देश/
इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात, तिकडे थोडक्यात वाचले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल