एकेकाळी दिल्लीवर सत्त असलेल्या काँग्रेसला पुन्हा जोरदार झटका बसला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीत सत्ते असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीतील ७० पैकी २३ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र या पैकी एकाला विजय तर सोडाच पण डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. आतापर्यंत झालेल्या मतमजोणीत राष्ट्रवादीला फक्त ०.०३ टक्के मते मिळाली आहेत. दिल्ली निवडणुकीत नोटाला ०.५७ टक्के इतकी मते मिळाली असून राष्ट्रवादीला त्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत.
advertisement
प्रेमानंद महाराजांवर मथुरेतील लोक नाराज; अनुयायी आणि लोकांमध्ये झाली बाचाबाची
राष्ट्रवादी काँग्रेसने याआधी ही महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवल्या होत्या. मात्र त्यांना कधीच फार यश मिळाले नव्हते. २०२०च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील ते मैदानात उतरले होते. पण तेव्हाही एकही जागा जिंकता आली नव्हती. जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षाची विभागणी झाल्यानंतर दिल्लीत होणारी ही पहिली निवडणूक होती.
महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीत मात्र युती न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे दिल्लीत पक्षाची वाढ करण्याचे होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा मोठा धक्का बसला आहे. 'आप'चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवालांचा भाजपच्या परवेश वर्मा यांनी पराभव केला.