आंध्र प्रदेश पोलिसांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार,कुर्नूल बस अपघाताला कारणीभूत असलेल्या बाईकवरील दोघेही मद्यधुंद होते. बाईकचा आधीच अपघात झाला होता. रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने बाईक स्वार हरिशंकरचाही मृत्यू झाला.मागे बसलेला स्वामीने गाडी आणि शंकरला रस्त्यावरून हटवण्यापूर्वीच एक भरधाव वेगात बस आली. बाईक बसमध्ये अडकली आणि सुमारे २०० मीटर ओढली गेली, ज्यामुळे तिची इंधन टाकी फुटली आणि आग लागली.
advertisement
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
अपघाताची ही संपूर्ण कहाणी हरिशंकरच्या मागे बसलेल्या स्वामीने पोलिसांना सांगितली. सलग दोन अपघात आणि बसला आग लागल्यानंतर, स्वामी घाबरून तुग्गळी या आपल्या गावी पळून गेला होता. नंतर, पोलिसांनी स्वामीला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली.त्यावेळी त्याने कबुली दिली की, आम्ही दोघेही दारूच्या नशेत होतो.हरिशंकर हा स्वामीला गावात सोडण्यासाठी निघाला. त्यांनी प्रथम एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. त्यानंतर पहाटे २:२४ वाजता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हरिशंकर बेजबाबदारपणे गाडी चालवताना दिसत होता.
बसने दुचाकीला २०० मीटर फरफटत नेले
परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. पेट्रोल पंप सोडल्यानंतर काही वेळातच बाईक घसरली. हरिशंकर उजवीकडे पडला आणि दुभाजकाला धडकला. स्वामीने शंकरला रस्त्याच्या मधोमध ओढून पाहिले तेव्हा तो मृतावस्थेत होता. स्वामी म्हणाला की, तो रस्त्यावरून त्याची बाईक हलवण्याचा प्रयत्न करत असतानाच बंगळुरूला जाणारी एक बस वेगाने आली, त्यांना चिरडले आणि काही अंतरापर्यंत ओढत नेले. त्यानंतर बसने पेट घेतला.
