इंदूर: येथील रहिवासी सारिका शर्मा यांनी त्यांची दोन वर्षांची मुलगी अनिका हिच्या उपचारासाठी नागरिकांना मदतीची विनंती केली आहे. अनिकाचे आई-वडील मंगळवारी जिल्हाधिकारी (कलेक्टर) शिवम वर्मा यांच्या जनसुनावणीत पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, 'अनिकाच्या उपचारासाठी लागणारा सुमारे 9 कोटी रुपयांचा खर्च आम्ही करू शकत नाही.'
advertisement
जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेतले आणि आश्वासन दिले की, 'शासन-प्रशासन तुमच्यासोबत आहे आणि उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.' यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी इंदूर जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्तींनाही अनिकाच्या उपचारासाठी पुढे येऊन मदत करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. मुलीचा तपशील आणि मदतीची प्रक्रिया 'सेवा सेतू ॲप' वर उपलब्ध असेल, ज्याद्वारे आवश्यक आर्थिक सहाय्यता उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
अनिका सध्या स्पाईनल मस्कुलर ॲट्रोफी (SMA) टाईप 2 नावाच्या एका दुर्मिळ आणि गंभीर आनुवंशिक आजाराशी झुंज देत आहे. हा आजार तिच्या शरीराला हळूहळू कमकुवत करत आहे, पण डॉक्टरांना अजूनही अनिकाला वाचवण्याची आशा आहे. तिच्या जीव वाचवण्यासाठी 'झोलगेन्स्मा' (Zolgensma) नावाच्या औषधाची गरज आहे, ज्याची किंमत अंदाजे 9 कोटी आहे.
तिच्या पालकांनी जनतेला आवाहन केले आहे की, तुमचे प्रत्येक लहान योगदान आमच्या मुलीच्या श्वासामध्ये नवीन प्राण फुंकू शकते. मदतीसाठी अनिकाचे वडील प्रवीण शर्मा यांच्या 9893523017 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
स्पाइनल मस्कुलर ॲट्रोफी (SMA) हा एक दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे, जो पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंच्या पेशींना नुकसान पोहोचवतो. यामुळे मेंदूकडून स्नायूंना संकेत मिळणे थांबते, परिणामी स्नायू कमकुवत होतात आणि हळूहळू क्षीण होतात.
