TRENDING:

अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला; दिल्लीत प्रचार करताना दगड, विटा फेकल्या, 'आप'ने व्हिडिओ शेअर केला

Last Updated:

Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीमुळे राजधानी नवी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशा या लढतीत आता एक मोठा राडा झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान वीट आणि दगडांनी हल्ला करण्यात आला आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
advertisement

या घटनेचा व्हिडिओ आपने सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतक नाही तर आपने नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्यावर आरोप केला आहे. आपने एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पराभवामुळे घाबरलेल्या BJP आपल्या गुंडाकडून अरविंद केजरीवाल यांच्यावह हल्ला केला आहे. भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी निवडणुकीचा प्रचार करत असताना अरविंद केजरीवाल यांच्यावर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ते प्रचार करू शकणार नाहीत. भाजपवाल्यांना तुमच्या या हल्ल्यांनी केजरीवार घाबरणार नाहीत. दिल्लीची जनता तुम्हाला यावर सडेतोड उत्तर देईल.

advertisement

ब्लॅक वॉरंट म्हणजे काय? कधी आणि कोणा विरुद्ध काढले जाते, त्यावर कोण सही करते?

आप नेत्या प्रियांका कक्कड म्हणाल्या, 'भाजपच्या गुंडांनी आज पुन्हा नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर दगडफेक करून हल्ला केला आहे.आजपर्यंत नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशा प्रकारची घटना कधीच घडलेली नव्हती.

advertisement

आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय

प्रवेश वर्मा जेव्हा तिथे प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी पाहिले की कितीही पैसा वाटल्यानंतर,काळे धंदे केल्यानंतरही जनता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे. हे पाहून भाजप आणि प्रवेश वर्मा यांनी आपल्या गुंडांकरवी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करवला आहे. कोणत्याही प्रकारे ते (भाजप) नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रात शांततापूर्ण निवडणुका होऊ देत नाहीत. निवडणूक आयोग डोळेझाक करत आहे... ते (प्रवेश वर्मा) आता हिंसेवर उतरल्यानंतर आहेत... मी अपेक्षा करते की निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांचे डोळे उघडतील.'

advertisement

मराठी बातम्या/देश/
अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला; दिल्लीत प्रचार करताना दगड, विटा फेकल्या, 'आप'ने व्हिडिओ शेअर केला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल