RG Kar Rape-Murder Case: आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
RG Kar Rape And Murder Case: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर आरोपी संजय रॉयला कोर्टाने दोषी ठरवले आ
कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज शनिवारी निकाल दिला. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संताप आणि निदर्शने झाली होती. संजय रॉयला दोषी ठरवताना तुला शिक्षा झालीच पाहिजे असे न्यायधीश म्हणाले. संजयला सोमवारी शिक्षा सुनावली जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
#WATCH | Kolkata, West Bengal: Additional District Judge Sealdah Court finds accused Sanjay Roy guilty in the RG Kar rape-murder case.
(Visuals from outside Sealdah Court) pic.twitter.com/lA6C6gOpTF
— ANI (@ANI) January 18, 2025
advertisement
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणाले: आरोपीने ज्या पद्धतीने पीडितेचा गळा दाबला त्यासाठी मृत्युदंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बीएनएस कलम ६४ ही १० वर्षांपेक्षा कमी नाही आणि कलम ६६ ही २५ वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे तर जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्युदंडाची शिक्षा आहे.
संजय रॉय कोर्टात काय म्हणाला...
संजय रॉयने न्यायालयात सांगितले की तो निर्दोष आहे. या प्रकरणी आापल्याला अडकवले आहे. खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. रॉयने सुरुवातीला गुन्ह्याची कबुली दिली होती, मात्र नंतर निर्दोष असल्याचा दावा केला.
advertisement
CBI ने आपल्या आरोपपत्रात काय म्हटले?
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या 45 पानी आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे की पीडितेचे रक्त आरोपी संजय रॉयच्या जीन्स आणि शूजवर आढळले. तसेच घटनास्थळावर त्याचे केस आणि त्याच्या मोबाईलसोबत सिंक झालेला ब्लूटूथ इयरपीस देखील आढळून आला असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 18, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/देश/
RG Kar Rape-Murder Case: आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय